
घरडा केमिकल्सच्या स्फोटातील जखमी कर्मचाऱ्याचा देखील मृत्यू
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल्स या रासायनिक कारखान्यात रिअॅक्टरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू होता तर एकावर नवी मुंबई येथील नॅशनल बर्न हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान पाचव्या कर्मचार्याचा अखेर मृत्यू झाला आहे. अभिजित सुरेश कवडे असे या कर्मचार्याचे नाव आहे. यामुळे कवडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
www.konkantoday.com