
सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यापाऱ्यांवर आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्याचा जिल्हा प्रशासनाच्या निर्णयावर भाजप उद्योग व्यापार आघाडी नाराज
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ एप्रिल पर्यंत आरटीपीसीआर टेस्ट न करणाऱ्या व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयावर भाजप उद्योग व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे. कोणत्याही व्यापारी संघटनांना विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.कोरोनाच्या एका वर्षाच्या काळात सर्वात जास्त नुकसान व्यापारी वर्गाचेच झाले आहे, असे असताना सर्व नियम व्यापाऱ्यांनाच का ? कोरोना फक्त व्यापाऱ्यांमुळेच पसरलाय का ? असा सवाल श्री. केनवडेकर यांनी उपस्थित केला आहे.
या संदर्भात प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी व दुकानातील कामगारांना कोरोना तपासणी बंधनकारक करण्यात आली असून ही तपासणी न केल्यास प्रशासन कारवाई करणार असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. हे आदेश व्यापाऱ्यांवर जबरदस्ती केल्यासारखे आहेत. आले मना काढला आदेश हे चुकीचे आहे
www.konkantoday.com