सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ कविलकाटे येथील बावकारवाडी येथे डुकरं मारण्यासाठी लावलेल्या विजेच्या फासकीत शॉक लागून दाेघांचा जागीच मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ कविलकाटे येथील बावकारवाडी येथील दिपक मातोंडकर व त्यांचा मुलगा भगवान मातोंडकर यांचा डुकरं मारण्यासाठी लावलेल्या विजेच्या फासकीत शॉक लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिपक मातोंडकर व त्यांचा मुलगा भगवान मातोंडकर यांच्या सोबत असलेला आणखी एक व्यक्ती जखमी झाल्याने त्याला कुडाळ ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे.
शेतातील नाचणीला पाणी लावण्यासाठी गेले असता डुक्कर मारण्यासाठी लावलेल्या विजेच्या फासकीत शॉक लागून मातोंडकर पिता, पुत्राचा जागीच मृत्यू झाला आहे.
www.konkantoday.com