रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालयाच्या नूतन विस्तारित इमारतीचे येत्या रविवारी उद्घाटन होणार
रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालयाच्या नूतन विस्तारित इमारतीचे येत्या रविवारी दि. ४ एप्रिल रोजी उद्घाटन होणार आहे. सुमारे २० कोटी रुपये खर्चुन ही न्यायालयाची इमारत पूर्ण झाली आहे. नुकतीच ही इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमुख जिल्हा न्यायाधिशांकडे हस्तांतरित केली आहे. तळमजला अधिक दोन मजले आणि बेसमेंट अशी या इमारतीची रचना आहे.
www.konkantoday.com