रत्नागिरी बाजार समितीने बेकायदेशीर दंडाची आकारणी थांबवली नाही तर बाजार समितीचे कार्यालय फोडून टाकू -माजी खासदार निलेश राणे
रत्नागिरी बाजार समितीने शेतमालाच्या गाड्या अडवून बेकायदेशीर दंड आकारणी करत आहे. हे लगेच थांबलं नाही तर रत्नागिरी बाजार समितीचे कार्यालय फोडून टाकू असा कडक इशारा, माजी खासदार व भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी बाजार समितीला दिला आहे.
या संदर्भात निलेश राणे यांनी एक ट्विट केले असून, ते यामध्ये म्हणतात की, रत्नागिरी बाजार समितीने शेतकऱ्यांवर दरोडा टाकण्याचा नवा मार्ग शोधलाय. शेतमालाच्या गाड्या अडवून शेतकऱ्यांना दंडाच्या पावत्या दिल्या जात आहेत. बाजार फीच्या नावाखाली या पावत्या दिल्या जात असून, आमचे बीजेपी चे सहकारी पोलीस तक्रार करत आहेत. हे लगेच थांबलं नाही तर रत्नागिरी बाजार समितीचे ऑफिस फोडून टाकू असा इशारा राणे यांनी दिला आहे
www.konkantoday.com