ग्लोबल कोकण आयोजित मायको, मानांकित कोकण हापूस आंब्याच्या पहिल्या वातानुकूलीत गाडीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते उद्घाटन

ग्लोबल कोकण आयोजित मायको, मनांकित कोकण हापूस आंब्याच्या पहिल्या वातानुकूलीत गाडीचे उदघाटन, कोकणचे सुपुत्र, परिवहन मंत्री सन्माननीय अनिल परब साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर संकल्पना ग्लोबल कोकणचे संयोजक सन्माननीय . किशोरभाई धारिया आणि सन्माननीय संजय यादवराव यांच्या माध्यमातून मांडण्यातुन आली. मायको या ग्लोबल ब्रांडच्या वतीने कोकणचा राजा हापूस आंबा अतिशय उत्तम दर्जात ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी याची वाहतूक वातानुकुलीत वाहनातून करण्याचा मानस ग्लोबल कोकणचा आहे. ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमास आदरणीय अनिल परब साहेबांनी सरकारच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button