हापूस आंबाच्या सिझनच्या वेळेतच कोरोनाने उचल खाल्याने हापूस आंब्याच्या निर्यातीला फटका

सलग दुसऱ्यावर्षी कोकणातील हापूस आंब्याचे कोरोनामुळे मोठे नुकसान झाले आहे. मार्च महिन्यात हापूस आंब्याचे मार्केटमध्ये आगमन होण्यास सुरुवात होते. स्थानिक बाजार पेठेबरोबर विदेशात हापूस आंब्याच्या निर्यातीला मुहूर्त मिळतो. मात्र सलग दुसऱ्या वर्षी हापूस आंबाच्या सिझनच्या वेळेतच कोरोनाने उचल खाल्याने हापूस आंब्याच्या निर्यातीला चांगलाच फटका बसला आहे.
गल्फ, सिंगापूर , हॉगकाँग, स्वित्झर्लंड, कॅनडा, लंडन, अमेरिका इत्यादी देशात कोकणातील हापूस आंब्याला चांगली मागणी असते.
फेब्रुवारी अखेरपासून हापूस आंब्याची या देशांमध्ये विमानाने आणि समुद्रामार्गाने निर्यात होत असते. सध्या कोरोनाचे सावट कायम असल्याने अनेक देशांतील विमानसेवा सुरु झालेल्या नाहीत. जिथे विमान सेवा सुरु आहेत, त्या फक्त कार्गो आहेत. पॅसेंजर विमानातून आंबा गेल्यास त्याचा खर्च कमी लागतो. पॅसेंजर विमानात किलोला साधारण ६० ते ६५रूपये खर्च येतो. आता आंबा स्पेशल कार्गो विमानाने पाठविल्यास कंपन्या किलोला १२० ते १३० रूपये आकारतात. जादा भाडे द्यावे लागत असल्याने विदेशात आंब्याचा दर वाढवून विकावा लागत आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button