
वीज बिल थकबाकीची वसुली करताना सामान्य माणसांना त्रास होता काम नये -माजी खासदार नीलेश राणे
वीज बिल थकबाकीची वसुली करताना सामान्य माणसांना त्रास होता काम नये या भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांच्या मागणीला महावितरणकडून सकारात्मक प्रतिसाद देत येत्या एप्रिलपासून ‘एक गाव एक दिवस’ अभियान राबवीत प्रत्यक्ष ग्रामस्थांशी बोलून त्यांच्या अडचणी दूर करूनच ही वसुली होईल, असे आश्वासन कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी दिले आहेशुक्रवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र सायनेकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नीलेश राणे यांचे निवेदन त्यांना दिले होते. यामध्ये वसुली करताना सामान्य नागरिकांना त्रास दिल्यास संघर्षाला तोंड द्यावे लागेल असा इशारा नीलेश राणे यांनी दिला होता.
www.konkantoday.com