
एकमेकाचे कट्टर राजकीय स्पर्धक असलेले आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार रमेश कदम यांचे मराठा आंदोलनामध्ये गळाभेट
चिपळूण येथील येथील मराठा समाजाच्या मोर्चात अनेक पक्षाचे नेते एकत्र आले होते. पण एकमेकाचे कट्टर राजकीय स्पर्धक असलेले आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार रमेश कदम नुसते एकत्रच आले नाहीत, तर जाधवांनी चक्क रमेश कदमांना कडकडून मिठी देखील मारली, ही गळाभेट मोर्चात लक्षवेधी ठरली.उपस्थितांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत या दोन्ही नेत्यांच्या मिठीचे जोरदार स्वागत देखील केले.
चिपळूणमध्ये मराठा समाजाने निषेध मोर्चाचे सोमवारी सकाळी आयोजन केले होते. या मोर्चात मराठा समाजाचे नेते तसेच राजकीय नेते देखील सामील झाले होते. आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार रमेश कदम यांचा सहभाग देखील अग्रभागी होता. आमदार शेखर निकम यांच्या गळ्यात हात टाकून भास्कर जाधव यांनी घोषणा दिल्या. तर दुसऱ्याच बाजूला उभे असलेले रमेश कदम यांना चक्क गळे मिठी मारून एक मराठा-लाख मराठा आशा जोरदार घोषणा दिली
www.konkantoday.com