राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढत चालला
मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गामुळे आधीच हैराण असलेले नागरिकांना आता उष्णतेचा सामना करावा लागत आहे. मुंबई शहरासह, नाशिक, सोलापूर, अकोला, सिधुदुर्ग, रत्नागिरीत उकाडा वाढला आहे. पुढच्या काही दिवसांत उष्णता आणखी वाढणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
मुंबईत पारा ४० अंशांवर
हवामान खात्याच्या वतीनं ट्विट करत के.एस. होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली. मुंबईचा पारा शनिवारी दुपारच्या सुमारास ४० अंशांवर पोहोचला असून, पुढच्या काही तासांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
www.konkantoday.com