
दापोली तालुक्यातील मुरूड पोस्ट ऑफिसमधील महिला पोस्टमास्तर पूर्वी तुरे यांची कार्यालयात गळफास घेवून आत्महत्या
दापोली तालुक्यातील मुरूड पोस्ट ऑफिसमधील महिला पोस्टमास्तर पूर्वी तुरे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली.
पूर्वी तुरे (३०) या गेल्या वर्षभरापासून मुरुड पोस्ट ऑफिस मध्ये पोस्टमास्तर म्हणून कार्यरत होत्या.त्यी नेहमी प्रमाणे सकाळी ऑफिसला गेल्या होत्या. दररोज ६ वाजता घरी येत असत.
मात्र ७ वाजून गेले तरी घरी न आल्याने घरच्यांचा शोधाशोध सुरू केली. त्यावेळी पूर्वी तुरे यांनी ऑफिसमध्ये पंख्याला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे आढळून आले. शुक्रवारी दुपारच्या सत्रात ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
www.konkantoday.com