अचानक उष्णता वाढू लागल्याने देवगड हापूसला जबर फटका
देवगड परिसरामध्ये अचानक उष्णता वाढू लागल्याने देवगड हापूसला जबर फटका बसला आहे.तीव्र उन्हामुळे मोठ्या प्रमाणात आंब्याची साल भाजल्यामुळे बागायतदार नुकसानीच्या गर्तेत सापडले आहेत. गेले काही दिवस किनारपट्टीचे तापमान सुमारे ३६ अंश सेल्सीअस असून आर्द्रता ४६ टक्के झाली आहे. याचा गंभीर परिणाम आंबा बागायतीवर दिसू लागला आहे. आंब्याची साल उष्णतेमुळे भाजून आंबा जमिनीवर पडतो. हा आंबा पिकतही नाही, यामुळे फेकून द्यावा लागत आहे
www.konkantoday.com