सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाहेरून येणार्या नागरिकांची तपासणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळकोकणात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच सावट असल्यामुळे साध्या पद्धतीने शिमगोत्सव साजरा करण्याचे प्रशासनाने निर्देश दिले आहेत. तसेच कोकणातील गावागावात मांडावर साजरा होणारा शिमगा उत्सवाला होणारी गर्दी लक्षात घेता चाकरमानी जिल्ह्यात दाखल होत असताना सीमेवर आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या निर्देशाने जिल्ह्याच्या सीमेवर खारेपाटण आणि करुळ येथे आजपासून आरोग्य पथक तैनात करण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभाग महसूल प्रशासन,पोलीस प्रशासन यांच्या वतीने जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे.
www.konkantoday.com