लोटे-परशुराम अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत कोका-कोलाच्या प्रकल्पाला चालना मिळणार, अधिकार्‍यांकडून पाहणी

गेली अनेक वर्षांपासून भूसंपादन केलेल्या लोटे-परशुराम अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत कोका-कोला प्रकल्प प्रस्तावित असून, त्या अनुषंगाने गुरुवारी येथील जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत विस्तारित क्षेत्रात अनेक वर्षांपासून प्रकल्पाविना एमआयडीसीची जागा विनावापर पडून आहे. कोकण रेल्वे व मत्स्य प्रक्रिया प्रकल्पाव्यतिरिक्त येथे अन्य प्रकल्प येत आहेत. याचीच चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र आता येथे कोका-कोला प्रकल्प येण्याचे निश्चित झाले असून, गुरुवारी येथील जागेची पाहणी करण्यात आली.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमेरिका दौऱ्यात न्यू यॉर्क येथील शीतपेय बनविणाऱ्या जगविख्यात कोका-कोला कंपनीसोबत करार करण्यात आला होता. हा प्रकल्प लोटे विस्तारित म्हणजेच लवेल, दाभीळ व सात्विणगाव परिसरातील ६५० हेक्टर क्षेत्रातील जागा निश्चित करण्यात आली होती
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button