
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांचे शिमगा व होळी संदर्भात आदेश
रत्नागिरी जिल्ह्यातील शिमगा उत्सव । होळी उत्सव कामी याकार्यालया कडील वरीलअ. क्र. 1 व्दारे आदेश व 2 आणि 3 व्दारे शुध्दीपत्रके निर्गमित करण्यात आली होती, तथापि, वरील
अ.क्र.4 अन्वये महाराष्ट्रशासनाकडील परिपत्रक क्रमांक आरएलपी-0221/प्र.क्र.95/विशा-1ब दिनांक 24 मार्च
2021 अन्वये होळी, धुलिवंदन व रंगपंचमी – 2021 कामी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या
आहेत. त्यास अनुसरुन रत्नागिरी जिल्हयातील शिमगा उत्सव । होळी उत्सव कामी वरील अ.क्र. 1 चा
आदेश व 2 आणि 3 ची शुध्दीपत्रके या आदेशाव्दारे रद्द करण्यात येत आहेत.
महाराष्ट्र शासनाकडील परिपत्रक क्रमांक आरएलपी-0221/प्र.क्र.95/विशा-1ब दिनांक 24 मार्च
2021 ने निर्गमित केलेल्या खालील मार्गदर्शक सूचना संपुर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी बंधनकारक राहतील.
- होळी / शिमगा हा सण संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मोठया उत्साहाने साजरा केला जातो या वर्षी
दिनांक 28/03/2021 रोजी होळीचा सण आहे. कोव्हीड – 19 चा वाढता प्रादुर्भाव पहाता कोणत्याही
प्रकारे गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करुन हा सण साधेपणाने साजरा करावा. - दिनांक 29/03/2021 रोजी धुलिवंदन व 02/04/2021 रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणारआहेत. दरवर्षी या सणा निमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगांचीउधळण करण्यात येत असते परंतू कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धुलिवंदन व रंगपंचमी हेसण साधेपणाने साजरे करावेत यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून जनजागृती करणेआवश्यक राहील.
- होळी / शिमगा निमित्ताने खास करुन कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते परंतु यावर्षी
पालखी घरोघरी न नेता मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल या करीता स्थानिक प्रशासनाने योग्य त्या
उपाययोजना कराव्यात. तसेच त्याठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सींगचे
तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घेण्यात यावी. - होळी व धुलिवंदन या उत्सवाच्या ठिकाणी मोठया स्वरुपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित
करू नयेत.
सदरचा आदेश आज दिनांक 26/03/2021 रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी निमित केला आहे.
(लक्ष्मीनारायण मिश्रा)
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडा’धिकारी
रत्नागिरी
www.konkantoday.com