
मराठा आरक्षणाची सुनावणी पूर्ण आता निकालाकडे लक्ष
मराठा आरक्षण खटल्याची पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोरील सुनावणी पूर्ण झाली असून घटनापीठाने निकाल राखून ठेवला आहे. सलग ९ दिवस चाललेल्या मॅरेथॉन सुनावणीदरम्यान घटनापीठाने आरक्षणाच्या बाजुने लढणारे पक्षकार, विरोधातील पक्षकार, महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार, मध्यस्थ, अनेक राज्य सरकारे यांची मते जाणून घेतली. आरक्षणाच्या तिढ्यावर घटनापीठ कोणता निकाल देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
www.konkantoday.com