कोकण मार्गावर दोन एक्स्प्रेस गाड्यांना अतिरिक्त डबे वाढवले


कोकण मार्गावरून धावणार्‍या रेल्वेगाड्या तोबा गर्दीने धावत आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी २ एक्स्प्रेस गाड्यांना अतिरिक्त डबे वाढवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी जाहीर केले.
त्यानुसार १२६२०/१२६११९ क्रमांकाची मंगळूर-एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेस २५ मार्च रोजी तर परतीच्या प्रवासात २६ रोजी एक स्लीपर श्रेणीच्या अतिरिक्त डब्यांची धावणार आहे. १५६८५/१५६८६ क्रमांकाची सर एम. विश्‍वेश्‍वरैया बंगळूर-मुर्डेश्‍वर एक्स्प्रेस २३ ते ३१ मार्च तर परतीच्या प्रवासात २३ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत एक अतिरिक्त वातानुकुलीत डब्यांची धावणार असल्याने रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button