कोकणातील शिमगोत्सवात कोरोनाचं संकट दूर होऊ दे असं साकड ग्रामदैवतेला घातलं जातय..
रत्नागिरी – कोकणातील शिमगोत्सवाला आजपासून सुरुवात झालीय.तेरशे शिमग्यापासून शिमग्याला ख-याअर्थानं सुरुवात होते. .ग्रामदैवतेच्या पालख्या सजून मंदिरातून होळी तोडण्यासाठी बाहेर पडतात..पोफळ ,सुरमाड, आंबा अशी झाडं होळीसाठी प्रामुख्यानं निवडली जातात.चतुर्सिमेच्या बाहेर जाऊन होळी तोडण्याची प्रथा आहे.पोमेंडी खुर्द मधील श्री महालक्ष्मीची पालखी होळी तोडण्यासाठी बाहेर पडलीय.कोरोनाच्या नियमावलीचं पालन करत यावर्षीचा महालक्ष्मीचा शिमगा साजरा केला जातोय. यावर्षी कोरोनाचं सावट या शिमगोत्सवावर असलेलं पहायला मिळालं. शाससकीय नियमावलीत यावर्षीचा शिमगोत्सव करण्यात येतोय. शिमगोत्सवासाठी केवळ ५० माणसांची मर्यादा असल्यानं दरवर्षी मोठा गाजावाजा करत …फाका मारत केला जाणारा शिमगा यावर्षी साध्याच पद्धतीनं साजरा केला जातोय..कोरोनाचं संकट दूर होऊ दे असं साकड या निमित्तान ग्रामदैवतेला घातलं जातय..
www.konkantoday.com