एलईडी मासेमारीबंदी कायदा होत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही -आमदार योगेश कदम

पारंपरिक मच्छीमार बांधवांच्या हिताचा बेकायदेशीर एलईडी मासेमारीबंदी कायदा होत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसून पारंपरिक मच्छीमारांना आपला पाठिंबा आहे. वेळ पडल्यास सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो तरीही आपण पारंपरिक मच्छीमार बांधवांच्या हितासाठी सरकारच्या विरोधात मंत्रालयासमोर आंदोलन करायची आपली तयारी असल्याचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी मच्छीमार साखळी उपोषणाला पाठिंबा दर्शवताना जाहीर केले.मत्स्य खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी आमदार योगेश कदम यांना फोनवरू बैठक लावतो तुम्ही मच्छीमारांना घेऊन मंत्रालयात या. आपण एलईडीबंदी कायद्याविरोधात बैठक घेऊ, असे सांगितले. अस्लम शेख यांचा फोन आल्याने साखळी उपोषणाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आहे.
www.konkamtoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button