उदय बने आता ५ एप्रिलला जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष होणार
जिल्हा परिषद अध्यक्षपदी विक्रांत जाधव यांची निवड झाल्यानंतर उपाध्यक्ष महेश नाटेकर यांनी पक्षाच्या आदेशाप्रमाणे तत्काळ राजीनामा सादर केला. या पदावरील निवडीसाठी ५एप्रिलला निवडणूक होणार आहे. या पदासाठी उदय बने यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. याचवेळी स्थायी समिती सदस्यांचीही नियुक्ती होणार आहे.
अध्यक्षपदासाठीचे प्रमुख दावेदार आणि ज्येष्ठ सदस्य उदय बने यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाकडून हे पद देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. उपाध्यक्षपदाबरोबरच बांधकाम व आरोग्य समिती सभापतिपदही त्यांना जोडून देण्यात आले आहे.
www.konkantoday.com