इंग्लंडने बंधने उठवल्याने कोकणातील हापूस निर्यातीला फायदा होणार
इंग्लंडमध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरील बंधने शिथिल केली असून त्यात हापूसवरील उष्णजल प्रक्रियेचा समावेश आहे. त्याचा फायदा निर्यातवाढीला होणार असून कोकणातील हापूसच्या निर्यातीत ३०ते ४०टक्के वाढ होईल, अशी आशा आहे. हा कोकणातील बागायदारांना दिलासा आहे. तसेच येत्या चार दिवसात रत्नागिरीतून पहिली शिपमेंट इंग्लंडला रवाना होणार आहे.
www.konkantoday.com