अल्पयीन मुलीला पळवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणार्‍या आरोपीला पॉक्सो विशेष न्यायालयाने १०वर्षे सक्‍तमजूरी ठाेठावली

रत्नागिरी तालुक्यातील लांजा-शिपोशी येथे अल्पयीन मुलीला जबरदस्तीने पळवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणार्‍या आरोपीला पॉक्सो विशेष न्यायालयाने १०वर्षे सक्‍तमजूरी व ३७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
समीर शशिकांत जाधव ( , रा . शिपोशी लांजा,रत्नागिरी ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.त्याच्याविरोधात पिडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनूसार,२४ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी पिडीत अल्पवयीन मुलगी कॉलेजहून घरी येत असताना संशयिताने तिचे अपहरण केले होते . या प्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात फुस लाऊन पळवून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.२०१७ ला एका लग्नात पिडीत मुलगी व आरोपी यांची ओळख झाली होती . प्रेम संबंध जुळून आले होते . त्यानंतर आरोपीने तिला लग्नाचे अमिष दाखवून १६जून २०१८ या कालवधीत तिच्या कॉलेजमध्ये जाऊन त्याच्यान गावी शिपोशी येथे घेऊन गेला आणि मुलीशी विविध ठिकाणी शारिरीक संबध ठेवले होतेत्यानंतर पिडीता वैद्यकीय तपासणीत गरोदर असल्याचे समजताच तिच्या वडिलांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली हाेती
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button