
मुरुगवाडा परिसरातील तरुणांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश.
रत्नागिरी : रत्नागिरीच्या विकासासाठी, न्यायासाठी आणि परिवर्तनासाठी शहरातील मुरुगवाडा परिसरातील शेकडो तरुणांनी आज (८ नोव्हेंबर) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मजबूत नेतृत्वावर विश्वास ठेवून हे तरुण शिवसेनेत सहभागी झाले आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे सेनेचे उमेदवार बाळ माने निवडणूक रिंगणात आहेत. रत्नागिरीचा विकास हवा असेल तर परिवर्तनाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घेऊन माजी आमदार बाळ माने, शिवसेना तालुकाप्रमुख बंड्या शेठ साळवी, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना तालुकाप्रमुख तथा शिवसेना शहर संघटक प्रसाद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.
मुरुगवाडा येथील रोहित दिवाकर मयेकर, विक्रांत सुधाकर जोशी, दिलीप रामचंद्र भोळे, दीपंकार दीपक भोळे, राकेश मनोहर शेट्ये, अभिषेक अनंत भोळे, अभिषेक अनंत मयेकर, सागर शरद पिलणकर, साहिल बिजू नायर, प्रसाद प्रदीप पिलणकर, गौरव संतोष कळबंटे, संतोष सोनू कळबंटे, आयुष जगदीप गुरव, राज विनायक जोशी, यश विजय हळदणकर, अनुप रमेश सुर्वे, अक्षय देविदास पिलणकर, विनायक सुधाकर जोशी, स्मिता विनायक शिवलकर या तरुणांनी जोश आणि नव्या उमेदीसह मोठ्या संख्येने ठाकरे सेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव खासदार विनायकजी राऊत यांच्या रत्नागिरीतील कार्यालयात पार पडला. यावेळी शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.