स्वच्छता अभियानाचे पहिले बक्षीस मिळवलेल्या रत्नागिरी नगरपरिषदेला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मोठा दंड ,वर्ष उलटूनही नगरपरिषदेने दंड भरला नाही

स्वच्छता अभियानाचे पहिले बक्षीस
मिळवलेल्या रत्नागिरी नगरपरिषदेला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून डम्पिंग ग्राउंडवरील प्रदूषणाप्रकरणी मोठा दंड ठोठावला आहे दंड ठोठावूनही एक वर्ष झाले तरी नगरपरिषदेने हा दंडही भरलेला नाही
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राउंडला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे त्या भागात प्रचंड वायू प्रदूषण होत आहे. याबाबत उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेवर ८ लाखाची दंडात्मक कारवाई केली आहे. वर्ष झाले तरी पालिकेने अद्याप हा दंड भरलेला नाही. प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा मोठ्या दंडासह पुढील कठोर कारवाई करण्यात यावी, असा अहवाल येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोल्हापूर कार्यालयाला पाठविण्याची तयारी केली आहे.
साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पमध्येच डंपिंग ग्राउंड आहे गलिच्छ बनले आहे दांडेआडोम येथील प्रस्तावित घनकचरा प्रकल्पाचा निकाल पालिकेच्या बाजूने लागला आहे. त्याचा फेर डीपीआर बनविण्यात येत आहे. कचऱ्याला वारंवार आग लावून प्रचंड प्रमाणात धूर पसरून वायू प्रदूषण होते या परिसरातील नागरिकांना व शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे याबाबत नागरिकांनी तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button