
सीमा वादापेक्षा येथे दिसले माणुसकीचे दर्शन,महाराष्ट्रातील व्यक्तीचे हृदय कर्नाटकातील व्यक्तीला बसविले
केएलई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या कोल्हापूर येथील रुग्ण ब्रेन डेड झाल्यानंतर त्याच्या हृदयाचे रोपण बेळगाव जवळील काकती येथील सतरा वर्षीय तरुणावर करण्यात आले. कर्नाटक-महाराष्ट्र दोन्ही राज्यात सीमा वाद आणि लाल पिवळ्या कन्नड ध्वजामुळे वातावरण तणावपूर्ण असताना महाराष्ट्रातील व्यक्तीचे हृदय कर्नाटकातील व्यक्तीला देण्यात आले. भाषावाद असला तरी मानवता श्रेष्ठ आहे, हेच या उदाहरणावरून दिसून आले
www.konkantoday.com