सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गांजाची वाहतूक करणार्या तीन तरुणांना अटक
सिंधुदुर्ग हुमरमळा येथे मुंबई-गोवा महामार्गावरुन दुचाकीने गांजा वाहतूक करणाऱ्या तीन युवकांना स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांनी हुमरमळा येथे पकडले. काल सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. यातील दोघे कणकवलीतील तर एक सोलापूरचा आहे. त्यांच्याकडून २किलो ९४ ग्रॅम वजनाचा गांजा, दुचाकी जप्त करण्यात आली.
महम्मद अजहरुद्दीन नसीर पठाण (रा. करमाला सोलापूर), सलमान इसाक शेख ( रा. वरवडे वरची मुस्लिम वस्ती), अशी दोघा संशयितांची नावे आहेत तर तिसरा संशयित अल्पवयीन आहे.
www.konkantoday.com