रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक दिपक गद्रे यांच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांनाअडीज वर्ष कैदेची शिक्षा

रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक दिपक गद्रे यांच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अडीज वर्ष कैदेची शिक्षा न्यायालयाने ठाेठावली.
निशांत उर्फ सनी प्रवीण परमार आणि नरसिंग दशरथ कारभारी (, दोन्ही रा. दहिसर मुंबई) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत याविरोधात दिपक पांडूरंग गद्रे यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली होती.त्यानूसार, १३ऑक्टोबर २०१८ रोजी निशांत परमारने गद्रे यांना फोन करुन मी मुंबईतून बोलतोय असे सांगत तुम्ही एकाला चोरटे पिस्तुल घेण्यास सांगितले होते.तो माझ्या ताब्यात असून हे प्रकरण मिटवण्यासाठी तुम्हांला २५ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगून गद्रे यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता.याप्रकरणी दिपक गद्रे यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपीना अटक केली होती या दाेघा आरोपींवर संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारचेअनेक गुन्हे दाखल आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button