कोकणात घरोघरी पालख्या नेण्यावर शासनाच्या गृहविभागाने बंदी घातली ,स्थानिक प्रशासनाने अंमलबजावणी करण्याच्या सूचना
राज्यात करोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढू लागला असल्याने राज्य सरकारच्या गृह विभागाने शिमगोत्सवावर निर्बंध घातले आहेत शिमगोत्सवात खासकरून कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते परंतु यावर्षी पालखी घरोघरी न नेता मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल यासाठी स्थानिक प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे आदेश दिले आहेत राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात काेराेनाचे रुग्ण मिळत असून त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून यावर्षी होळी धूलिवंदन रंगपंचमी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत होळी व धूलिवंदन या उत्सवाच्या ठिकाणी मोठ्या स्वरुपात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कडक निर्बंध स्थानिक प्रशासनाने यापूर्वीच लादले असतील तर ते लागू राहतील अथवा या परिपत्रकानंतर देखील कडक निर्बंध लादू शकतील मात्र मार्गदर्शक सूचना यापेक्षा शिथिल करता येणार नाहीत असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे कालच अशाप्रकारचे परिपत्रक गृह विभागाकडून आले असले तरी स्थानिक जिल्हा प्रशासनाने याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही याआधी स्थानिक प्रशासनाने ठराविक लोकांच्या उपस्थितीत पालख्या फिरवण्यास परवानगी दिलेली होती शासनाच्या वेगवेगळ्या विभागाकडून वेगवेगळी परिपत्रके येत असल्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होत आहे
www.konkantoday.com