कोकणातील हापूस चा सुगंध जगभर न्यायला हवा -उपमुख्यमंत्री अजित पवार

परदेशातून हापूस आंब्याला वाढती मागणी असून, हॉलंड येथे ४०० डझन आणि युके येथे ४०० डझन आंबा पेटींची ‘मायको’द्वारे प्रथमच निर्यात करण्यात येत आहे.निर्यात पेटींचा आरंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. ‘मायको’ या देशातील पहिल्या मँगोटेक प्लॅफॉर्मच्या माध्यमातून शेतकर्‍यांना बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने त्यांना योग्य तो मोबदलाही मिळत आहे.
कोकणातील हापूस चा सुगंध जगभर न्यायला हवा असं म्हणत शेतातील हापूस आंबा थेट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्याची संकल्पना खरोखरच चांगली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असून त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येक उपक्रमाला आमचा पाठिंबा कायम राहील, अशा शब्दांत अजित पवार यांनी या संकल्पनेचं कौतुक केलं. लवकरच महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंबा बाजार आयोजित केला जाणार असून त्याला शासनातर्फे पूर्ण पाठिंबा असल्याचे आश्वासनही त्यांनी दिलं.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button