कारवांचीवाडी येथे दुकान मालकाला पिस्तुलचा धाक दाखवून एकूण ५२हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवविणार्या तिघां जणाची टाेळी पकडण्यात पोलिसांना यश
रत्नागिरी शहराजवळील कारवांचीवाडी येथे दुकान मालकाला पिस्तुलचा धाक दाखवून ५२हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवविणार्या तिघां जणाची टाेळी पकडण्यात पोलिसांना यश ही घटना ६ मार्च रोजी घडली होती
किशोर कांतीलाल परमार (, सध्या रा.सिंधुदुर्ग मुळ रा.राजस्थान),अणदाराम भुराराम चौधरी ( सध्या रा.बेळगाव मुळ रा.राजस्थान) आणि ईश्वरलाल तलसाजी माझीराणा (रा.राजस्थान) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे.त्यांच्याविरोधात भेराराम ओखाजी सुन्देशा (रा.खेडशी,रत्नागिरी) यांनीग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली होती. ६ मार्च रोजी रात्री ८ वा.सुमारास भेराराम यांच्या मालकीच्या महालक्ष्मी ट्रेडर्स या दुकानात या तिघांनी येउन त्यांना पिस्तुलचाधाकदाखवलाहोता .त्यानंतर त्यांच्याकडील रोख १५ हजार रुपये,सोन्याचीअंगठी ,मोबाईल ,सीसीटिव्ही डिव्हिआर असा एकणू ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल घेउन गाडीतून पळ काढला होता.याप्रकरणी तपास करताना ग्रामीण पोलिसांनी संशयितांना गुजरातमधून अटक करुन केले व न्यायालयात हजर केले
www.konkantoday.com