होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सुरत उधना जंक्शन ते मडगाव दरम्यान सुपरफास्ट फेस्टिवल स्पेशल गाडी
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सुरत उधना जंक्शन ते मडगाव दरम्यान सुपरफास्ट फेस्टिवल स्पेशल गाडी दि. २६मार्च रोजी धावणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावताना ही गाडी खेड, चिपळूण, संगमेश्वरसह रत्नागिरी स्थानकावर थांबणार आहे.
याबाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार उधना ते मडगाव दरम्यान धावणारी ही गाडी (09067/09068) दि. २६मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी ९.३० वा. मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मडगावहून दि. २७ रोजी दुपारी साडेबारा वाजता सुटून दुसर्या दिवशी ती पहाटे ४ वा. २५मिनिटांनी ती उधना स्थानकावर पोचेल.संपूर्ण प्रवासात ही गाडी नवसरी, वलसाड, वापी, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थीवी तसेच करमाळी या स्थानकावर थांबणार आहे
www.konkantoday.com