होळीचा उत्सव, धुलिवंदन खासगी किंवा सार्वजनिक ठिकाणी साजरा करण्यास मुंबई महानगर पालिकेकडून मनाई
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येनं रुग्ण वाढू लागले आहेत. ही रुग्णवाढ सातत्याने ३ हजारांच्या वर असल्यामुळे प्रशासनासाठी ती चिंतेची बाब ठरली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जारी केलेली असताना आता मुंबई महानगर पालिकेने देखील काही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी येत्या रविवारी असणारा होळीचा उत्सव, तसेच त्यानंतर असणारा धुलिवंदन हा उत्सव खासगी किंवा सार्वजनिक अशा कोणत्याच ठिकाणी साजरा करण्यास मुंबई महानगर पालिकेकडून मनाई करण्यात आली आहे
www.konkantoday.com