
राणे कुटुंबियांना आव्हान देण्याचे शिवसेनेचे आव्हान फाेल,सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी अखेर भाजपच्या संजना सावंत विजयी
प्रतिष्ठेच्या बनलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी अखेर भाजपच्या संजना सावंत विजयी झाल्याआहेत. तर शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांना पराभव सहनकरावा लागला. ३० विरुद्ध १९ अशा मतदान प्रक्रियेत हात उंचावून हीनिवड प्रक्रिया पार पडली. या पदासाठी भाजपसह शिवसेनेने जोरदारमोर्चेबांधणी केली होती.मात्र शेवटच्या टप्यात नारायण राणे यांनी
आपला गड कायम राखला आहे.
www.konkantoday.com




