रत्नागिरी जिल्हापरिषदेचे नुतन अध्यक्ष विक्रांत जाधव यानी कार्यभार स्वीकारताच दिले जि.प अधिकाऱ्यांना वेळेचे धडे
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी कार्यभार स्वीकारताच आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली सभेला उशिरा उपस्थित करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी पहिल्याच दिवशी सूचना वजा समज दिली
जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाच्या सभेला सर्व पदाधिकारी सभागृहात पोहोचले तेव्हा दोनच अधिकारी सभागृहात उपस्थित होते. त्याबाबत अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. जाधव म्हणाले की, साडेबाराची सभा होती.आम्ही सर्व पदाधिकारी पाऊणला सभागृहात आलो़. त्यावेळी फक्त आरोग्य अधिकारी आणि एक अधिकारी सभागृहात आम्हालादिसले.सभागृहात वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते हे जिल्हा परिषदेच्या दृष्टीने योग्य नाही. सर्वांनी वेळेतच सभागृहात आले पाहीजे़. पहिलीच सभा आहे म्हणून मी फक्त सूचना करत आहे असे विक्रांत जाधव यांनीअधिकाऱ्यांना सांगितले
www.konkantoday.com