सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि सभापती निवडणुकीत शिवसेना राणेंना धक्का देण्याच्या तयारीत
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि सभापती पदांची निवड उद्या, २४ मार्चला होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. खासदार नारायण राणे यांच्या गोटातून शिवसेनेत गेलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत हे राणेंना धक्का देण्यासाठी गेले काही दिवस जोरदार फील्डिंग लावत आहेत
www.konkantoday.com