
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी संसदेच्या लॉबीमध्ये आपल्याला धमकावल्याचा अमरावतीच्या खासदार नवनीत राणांचा आरोप
महाराष्ट्रात कशी फिरतेस, ते पाहू…’ अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप खासदार नवनीत राणांनी केलाय. तर अरविंद सावंत यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत.
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी संसदेच्या लॉबीमध्ये आपल्याला धमकावल्याचं अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठलेल्या पत्रात म्हटलंय.
नवनीत राणांनी काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी केली होती. सचिन वाझे प्रकरण आणि त्याही आधी अनेकदा त्यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
www.konkantoday.com