
राष्ट्रवादीचे सदस्य विक्रांत जाधव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्याबद्दल राष्ट्रवादीकडून आनंद व्यक्त
रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व असताना राष्ट्रवादीचे सदस्य विक्रांत जाधव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांना खुश करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सदस्य जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला याचा आनंद राष्ट्रवादीच्या नेत्याना आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा जाधव म्हणाले, रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेनेचे वर्चस्व आहे. आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतरही विक्रांत जाधव यांनी राष्ट्रवादी सोडली नव्हती. आजही ते राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. राष्ट्रवादीचे विक्रांत जाधव यांना शिवसेनेने संधी दिली. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा पॅटर्न यशस्वी झाला.
रोहन बनेंच्या रुपाने जिल्हा परिषदेला तरुण अध्यक्ष लाभला होता. त्याची जागा विक्रांत जाधवने घेतली याचा आनंद आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झाला याचाही आनंद आहे. विक्रांत जाधवमध्ये चांगले गुण आहेत. आमदार भास्कर जाधवांचे त्याला मार्गदर्शन तर मिळणार आहेतच. आम्हीही त्याच्याबरोबर आहोत. अध्यक्ष म्हणून तो चांगले काम करून जिल्ह्याला न्याय देईल, अशी अपेक्षा आहे.असे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी म्हटले आहे
www.konkantoday.com