
ना. उदय सामंत ह्यांनी घेतले परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांचे आशिर्वाद
रत्नागिरी येथे आयोजित परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या महासत्संग सोहळ्यामध्ये राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थित राहून त्यांचे आशीर्वाद घेतले. या सोहळ्यात बोलताना गुरुमाऊलींनी माझ्या पाली गावाच्या सेवा केंद्राचा उल्लेख करताना आठवणी जागवल्या, कारण हे केंद्र त्यांच्या पहिल्या पाच सेवा केंद्रांपैकी एक आहे, याचा मनस्वी आनंद असल्याचे मा. ना. उदयजी सामंत म्हणाले.


आमचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब आणि गुरुमाऊली यांचे गुरु-शिष्याचे अनमोल नाते आहे. त्यामुळे गुरुमाऊलींच्या आशीर्वादाची छत्रछाया शिंदे साहेबांसोबतच आम्हा सर्वांवर आहे असे सांगत मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी हा दिव्य सत्संग सोहळा रत्नागिरी नगरीत आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.

