
नाणार प्रकल्पाबाबत भाजपच्या बदलेल्या भूमिकेविषयी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची जोरदार टीका
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार (ता. राजापूर) येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला. सेनेचा पूर्वीही विरोध होता आणि आजही आहे. मात्र भाजपने सोयीने भूमिका बदलली. तेव्हा सत्ता प्यारी होती म्हणून प्रकल्प रद्द केला आणि सेनेच्या दबावामुळे रद्द केल्याचे सांगितले. म्हणजे तेव्हा सत्ता प्यारी होती, म्हणून लोकांबद्दल प्रेम वाटत नव्हते. मग आता ते अचानक कसे जागृत झाले, असा टोला आमदार भास्कर जाधव यांनी भाजपला लगावला नाणार प्रकल्पाबाबत भाजपच्या बदलेल्या भूमिकेविषयी त्यानी सडकून टीका केली. ते म्हणाले, भाजपला गोबेल्स नीतीची सवय जडली आहे.
www.konkantoday.com