चिपळूण कराड मार्गावरील पिंपळीवरचीवाडी येथे बंद घर फोडून चार लाखांचा ऐवज लंपास
चिपळूण कराड मार्गावरील पिंपळीवरचीवाडी येथे बंद घर फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत चिराग कृष्णा तारये (वय २८, रा.पिंपळी खुर्द वरचीवाडी) यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. तारये हे १८ ते २१ मार्च या कालावधीत घर बंद करुन बाहेर गेले होते. घर बंद असल्याच्या संधीचा फायदा घेत, चोरट्याने घराच्या दर्शनी दरवाजाची कडी कोणत्या तरी लोखंडी हत्याराने उचकटून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील दोन्ही बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेले ४ लाख २ हजार ९ ५० रुपये किमतीचे दागिने तर २ हजार रुपये असा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी पोलीस स्थानकांत चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com