चिपळुणातील बांधकाम व्यावसायिक शाहनवाज शाह यांनी वाशिष्ठी नदीच्या पुनरुज्जीवना साठी ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार केली
चिपळूण शहराची जीवनवाहिनी ठरलेल्या वाशिष्ठी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार झाली आहे. येथील बांधकाम व्यावसायिक शाहनवाज शाह यांनी ही ब्ल्यू प्रिंंट तयार केली असून गेली चार वष्रे अभ्यास करून त्यांनी ही प्रिंट तयार केली आहे. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीप्रमाणे वाशिष्ठी नदीचा विकास व्हावा, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.जल पर्यटन, पक्षी निरीक्षण, निसर्ग संवर्धन, सुंदर बागांची निर्मिती, नदीलगत घाटाची बांधणी, उद्याने, सुशोभिकरण, वॉकिंग ट्रॅकसारख्या योजना आखल्यास चिपळूण शहराचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद वाशिष्ठी नदीमध्ये आहे. या संदर्भात बांधकाम व्यावसायिक शाहनवाज शाह यांनी ब्ल्यू प्रिंट तयार केली असून त्याला कोट्यवधीचा खर्च अपेक्षित आहे. परंतु त्यातून न.प.लाही कोट्यवधीचे उत्पन्न मिळू शकते असा दावा शाह यांनी केला आहे.
www.konkantoday.com