सायबर सुरक्षिततेसाठी राजापूर अर्बन बँकेने आणखी एक पाऊल उचलले
सायबर सुरक्षिततेसाठी राजापूर अर्बन बँकेकडून आणखी एक पाऊल उचलण्यात आले आहे ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करतानाच बँकेकडून सायबर सुरक्षिततेबाबत अधिकाधिक खबरदारी घेण्यात येत आहे यासाठी राजापूर बँकेने सीम टेक्नॉलॉजी टूल म्हणजे सिक्युरिटी इन्फॉर्मेशन इव्हेंट मॅनेजमेंट ही टेक्नॉलॉजी स्वीकारली आहेत या सुविधेमुळे बँकेच्या ग्राहकांचा डाटा सुरक्षित राहणार आहे अशी माहिती बँकेचे चेअरमन जयंत अभ्यंकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर कुमार अहिरे यांनी दिली आहे यासाठी बँकेने नाशिक येथील लुमीवस सोल्युशन या कंपनीशी करार केला आहे
www.konkantoday.com