
युथ फेस्टीव्हल आर्टीस्ट असोसिएशनच्या गणेशोत्सव फोटोग्राफी स्पर्धेला महाराष्ट्रामधून उत्स्फूर्त प्रतिसाद, राजेश वराडकर, – शैलेश इंगळे, शरद पाटील, विजेते
कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या विरोधात संपूर्ण देश लढा देत आहे. कोरोना कालावधीत कलाकारांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कलागुणांची जोपासना व्हावी यासाठी युथ फेसिव्हल आर्टीस्ट असोसिएशन (Yfaa) ने राज्यस्तरीय गणेशोत्सव फोटोग्राफी स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले. पी ए एस फाऊंडेशन, पारिजात फाऊंडेशन, मुंबई तसेच महाराजा फाऊंडेशन रत्नागिरी यांच्या सहकार्याने ही स्पर्धा सर्व वयोगटासाठी आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेचे गुगल फॉर्मच्या माध्यमातून हे फोटो अपलोड करण्यात येत होते. राज्यभरातून आलेल्या विविधांगी आकर्षक 271 फोटोंमधून 30 नंबर निवडण्यात आले. यामध्ये
प्रथम क्रमांकास 1000/- रू व सर्टिफेकेट,
द्वितीय क्रमांकास 700/- रु. व सर्टिफिकेट,
तृतीय कमांक 500 रुपये व सर्टिफिकेट तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग ई-सर्टिफिकेट देण्यात आले.
यामध्ये प्रथम कमांक- राजेश प्रभाकर वराडकर, दादर,
द्वितीय कमांक – शैलेश इंगळे, रत्नागिरी,
तृतीय कमांक – शरद पाटील, इचलकरंजी
यांना देण्यात आले सुपर 30 चे परिक्षक म्हणून परेश राजीवले आणि अंतिम स्पर्धेचे परिक्षक श्री. समाधान पारकर यांनी उत्तमरीत्या काम पाहिले. प्रथम कमांक प्राप्त राजेश वराडकर यांनी गणपती विसर्जनावेळी पाण्याचे उडणारे फवारे आणि त्यातूनही स्पष्टपणे दिसणारी गणेशाची मूर्तीने परीक्षकांचे मन वेधून घेतले. तर द्वितीय कमांक शैलेश इंगळे यांनी गणेशाभोवती केलेली सजावट हेच आकर्षण होते. तर तृतीय कमांक शरद पाटील यांनी कोरोना योध्दे अर्थात पोलिस गणेशविसर्जनावेळी गणरायासमोर नतमस्तक होऊन कोरोना लढ्याशी दोन हात करण्यासाठी शक्ती दे अशापकारचे काढलेले छायाचित्र लक्षणीय होते.
या स्पर्धेचे सह प्रायोजक समाधान पारकर (अध्यक्ष, पी ए एस फाऊंडेशन, मुंबई,), स्वाती देवळेकर (अध्यक्षा, पारिजात फाऊंडेशन, मुंबई), बीपिन शिवलकर (संचालक, महाराजा फाऊंडेशन, रत्नागिरी) होते.
या स्पर्धेचे टेकनिकल काम प्रा.शुभम पांचाळ यांनी पाहिले तर प्रचारक म्हणून संकेत आंबेकर, राजेंद्र पवार, समृद्धी गांधी, तन्मय सावंत यांनी उत्तम काम पाहिले स्पर्धा आयोजन प्रा. आनंद आंबेकर (संघटक, युथ फेस्टिव्हल आर्टिस्ट असोसिएशन, रत्नागिरी) यांनी केले होते.
www.konkantoday.com
