राजापूर तालुक्यातील नाटे – साखरी नाटे मधील किल्ले घेरा यशवंतगड प्रशासनाकडून दुर्लक्षित,शिवप्रेमींकडून नाराजी

राजापूर तालुक्यातील नाटे – साखरी नाटे मधील किल्ले घेरा यशवंतगड प्रशासनाकडून दुर्लक्षित असला तरी शिव संघर्ष संघटना, ओमसाई समर्थ मित्र मंडळ, व्यापारी संघटना यांच्या सोबत इतर अनेक संघटनाचे शिवप्रेमी दूरवरून या किल्ल्याच्या संवर्धनासाठी येत असतात. त्यांचा एक भाग म्हणून शिव संघर्ष संघटना आयोजित किल्ले घेरा यशवंत संवर्धन मोहिम रविवार दिनांक २१ मार्च २०२१ रोजी घेण्यात आली.

सदर मोहिमेमध्ये स्थानिक महिलांसह जवळ जवळ ७० शिवप्रेमी उपस्थित होते. दुर्गवीर प्रतिष्ठानचे अनेक शिवप्रेमी या मोहिमेमध्ये सामील झाले होते. तसेच धाऊलवल्ली ग्रामपंचायत सदस्य सत्यवान कोठारकर आपल्या टीम सोबत सहभागी झाले होते. स्थानिक महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

सदर मोहिमेदरम्यान गोगटे कॉलेजच्या आर्ट्स शखेच्या विद्यार्थ्यांनी किल्ले घेरा यशवंतगडला इतिहास अभ्यासक जोशी सर,कातळशिल्प अभ्यासक रीचबुड सर आणि गोगटे कॉलेजचे तेंडुलकर सर यांच्यासह भेट दिली.
सदर मोहिमेमध्ये शिव संघर्ष संघटना, ओम् साई समर्थ मित्र मंडळ, व्यापारी संघटना इत्यादीचे प्रतिनिधी मनोज अडविरकर, बाळा कुबडे, निलिन करजवकर, दिलीप लीपारे, गोसावी, भूषण नार्वेकर, रमेश लांजेकर, नरेश साखरकर इत्यादी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button