रत्नागिरी पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवत तेलंगणातील वृध्दाची व कुटुंबाची भेट घालून दिली
मनोरुग्ण असलेल्या व तेलंगणातून रत्नागिरीत जिल्ह्यातील गुहाघर येथील अंजनवेल येथे बेवारसरीत्या फिरत असलेल्या एका वृद्धाच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्याला त्याच्या कुटुंबीयां कडे सुपूर्द करण्याची मोलाची कामगिरी रत्नागिरी पोलिसांनी पार पाडली
गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील आरजापीपीएल कंपनीजवळील बसस्टॉपच्या शेडमध्ये राहणार्या
वैकन्ना वीरय्या वरीकोपल्ला (58,रा.ग्राम आक्रोम जि.नालगोंडा रा.तेलंगणा) असे त्या वृध्दाचे नाव आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून तो विमनस्क अवस्थेत कंपनीजवळील शेडमध्ये रहात असल्याचे तेथील सुरक्षा अधिकार्यांच्या निदर्शनास आले होते.वैकन्नाला फक्त तेलगू भाषा येत असून कंपनीत तेलगू भाषा येणार्या स्टाफने त्याची चौकशी करुन याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांना माहिती दिली.त्यानूसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्या वृध्दाच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी तेलंगणा राज्यातील पोलिसांशी संपर्क साधून वृध्दाच्या नातेवाईकांचा शोध घेतला.
दरम्यान,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरी येथील स्वयंसेवी संस्था राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांच्याशी संपर्क साधून वैकन्नाला गुहागरहून रत्नागिरीत आणण्यास सांगितले.तेव्हा वैकन्ना मनोरुग्ण असल्याचे लक्षात येताच त्याला प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले.याच कालावधीत मोबाईलवर नातेवाईकांशी संपर्क करुन प्रौढाची ओळख पटल्यावर १९ मार्च रोजी त्याचे नातेवाईक रत्नागिरीमध्ये आले वैकन्नाचे नातेवाईक प्रादेशिक मनोरुग्णालयात जाउन त्याला ओळखून आपल्यासोबत हैदराबादला घेउन गेले. वैकन्नाच्या मुलींना मराठी किंवा हिंदी भाषा येत नव्हती.त्यांना फक्त तेलगू भाषा येत होती.परंतू त्यांच्या चेहर्यावरुन रत्नागिरी पोलिसांबाबत असलेले कृतज्ञतेचे भाव ओळखून येत होते.वैकनाच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास पोलिस अधिक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हवालदार शांताराम झोरे व नितीन डोमणे यांनी सहभाग घेतलेला आहे.तसेच राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांनी महत्त्वाचे सहकार्य केलेले आहे.पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे
www.konkantoday.com