
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीत एक मगर मृतावस्थेत आढळली.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीमध्ये आज सकाळी एक महाकाय मगर मृतावस्थेत आढळली. खेड आणि भोस्तेदरम्यान गणेशघाट परिसरात ही महाकाय मगर मृतावस्थेत आढळली आहे. जगबुडी नदीमध्ये मगरींच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ हाेत आहे
खेडमधील बारामाही वाहणाऱ्या या जगबुडी नदीत शेकडो महाकाय मगरींचे वास्तव्य आहे, म्हणून याठिकाणी क्रोकोडाईल पार्क व्हावे असा प्रस्ताव गेल्याच महिन्यात शासन दरबारी आमदार योगेश कदम यांनी सादर केला हाेता परंतु या नदीत होणार्या मगरीच्या मृत्यूमुळे चिंता वाढली आहे
www.konkantoday.com