
गणपतीपुळ्यात चित्रिकरणामुळे पर्यटन वाढणार
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नव्याने प्रदर्शित होणार्या नवरा माझा नवसाचा-२ या चित्रपटाच्या गणपतीपुळे येथे झालेल्या शुटींगमुळे पुन्हा एकदा गणपतीपुळेच्या पर्यटनाला नवीन चालना मिळणार असलल्याचे मत व्यक्त होत आहे. तसेच नवरा माझा नवसाचा-२ चित्रपटाच्या शुटिंगमुळे पर्यटकांनी गणपतीपुळेला पुन्हा मोठी पसंती दर्शविल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर गणपतीपुळेच्या पर्यटनात आणखी भर पडेल, असा अंदाज स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात आला आहे.या ठिकाणी चार दिवसांच्या कालावधीत झालेल्या चित्रपटाच्या शुटिंगमुळे गणपतीपुळे पंचक्रोशीतील स्थानिक ग्रामस्थांबरोबरच आलेल्या पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे ठिकठिकाणी न्या चित्रपटाच्या शुटिंगची प्रसिद्धी पर्यटकांमधून करण्यात येणार असल्याने गणपतीपुळेच्या पर्यटनस्थळाचे नाव आणखी जगाच्या कानाकोपर्यात पोहचणार आहे.www.konkantoday.com