नाम फाऊंडेशन व ग्रामस्थांच्या मदतीने काजळी नदीचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामाला सुरवात
कोकणातील अनेक नद्या गाळामुळे भरल्या आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी नदीची पात्रे उथळ झाले आहेत काजळी नदीतील गाळ उपसून नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम नाम फाऊंडेशन व ग्रामस्थांच्या मदतीने हाती घेण्यात आले आहे या नदीतील गाळ उपसल्यानंतर नदीची साठवण क्षमता वाढणार असून त्यामुळे नजिकच्या साखरपा, कोंडगाव, भडकंबा या गावांचा पाणीप्रश्न संपुष्टात येणार आहे त्यानंतर देवळे ,देवडे, मुर्शी ,सांगव गावातील नदीचा गाळ उपसण्याचे काम सुरू होणार आहे काजळी नदीच्या गाळ उपसा कामाला फेब्रुवारी महिन्यात सुरुवात झाली असून पावसाआधी हे काम पूर्ण होणार आहे
www.konkantoday.com