
जमीन मालकांना विश्वासात घेवून काम करावे या मागणीसाठी मोडकाघर-गुहागर महामार्गाचे काम ग्रामस्थांनी रोखले
गुहागर-बिजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम मोडकाघर पूल ते मार्गताम्हाणेपर्यंत सुरू आहे. परंतु मोडकाघर ते गुहागर मार्गासाठी ठेकेदाराने लावलेला जेसीबी ग्रामस्थांनी रोखल्याने ठेकेदाराने काम बंद केले आहे. जमीन मालकांना विश्वासात घेवून काम करावे, अशी मागणी येथील जमीन मालक करत असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करताना पहावयास मिळत आहे.
www.konkantoday.com