अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही-राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर असल्याचे सांगणार्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी रविवारी दिल्लीत आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतली. सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर तसेच देशमुख यांच्या भवितव्याबाबत चर्चा केली. बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगितल्याने देशमुखांना तूर्तास अभय मिळाली आहे. दरम्यान आज सोमवारी शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चर्चेनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com